''जरांगे पाटील एक प्रामाणिक भावना घेऊन या लढ्यात उतरले आहेत, अशी आमची भावना होती. अनेक वेळा मागण्या बदलत गेल्या. आता मुख्यमंत्री म्हणून मी भेटायला गेलो. ५६ मोर्चे शांततेत झाले. यावेळी कुठे आग लावली, दगडफेक झाली. मराठा समाज संयमी आहे. पण त्याला गालबोट लावण्याचं काम करत आहेत, तरूणांनी सावध राहिले पाहिजे, या माझ्या सूचना आहेत'', असं मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
जरांगे यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ''मुख्यमंत्री असतानाही मी इगो ठेवला नाही. आता त्यांची भाषा ही राजकीय झाली आहे. त्यांच्या मागे कोणीतरी आहे, असा वास येतोय. अशा प्रकारचे वक्तव्य ही संस्कृती नाही. त्यांना कोणी बोलायला लावतय का ?''
बातमी शेअर करा