Advertisement

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा रद्द

प्रजापत्र | Tuesday, 13/02/2024
बातमी शेअर करा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा १५  तारखेला होणारा महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द झाला आहे. हा दौरा पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १५ फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते.या दिवशी ते महाराष्ट्रातील अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील १५ लोकसभा मतदारसंघांतील तयारीचा आढावा शाहा यांच्याकडून घेण्यात येणार होते. या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार होते. मात्र, हा दौरा रद्द करण्यात आलाय. 

 

 

कसा होता दौरा? 
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १५ फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते. या दिवशी त्यांच्याकडून महाराष्ट्रातील अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील १५ लोकसभा मतदारसंघांतील तयारीचा आढावा घेण्यात येणार होता. या दौऱ्यात त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार होते.

Advertisement

Advertisement