भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणी त्यांचा मुलगा वैभव गायकवाडसह दोघांना अटक करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून पोलीस दोघांचा शोध घेत होते. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनी ही कारवाई केली आहे.
वैभव गायकवाड आणि गणपत गायकवाड यांचा चालक रंजीत यादव या दोघांना आज उल्हासनगर कोर्टात हजर केले जाणार आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. तेव्हापासून दोघेही फरार होते.
घडलेल्या प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांनी अन्न त्याग केला आहे. त्यामुळे तज्ज्ञांकडून त्यांचे समुपदेशन होण्याची शक्यता वर्तवली जातेय. गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये आता वैभव गायकवाडसह दोघांना अटक करण्यात आल्याने एकूण ९ जण पोलिसांच्या अटकेत आहेत.