Advertisement

महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा

प्रजापत्र | Friday, 09/02/2024
बातमी शेअर करा

पुणे- शहरात 'निर्भय बनो'च्या कार्यक्रमावरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. सभा उधळण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची कार अडविण्याची घटना समोर आली आहे. तसेच भाजप कार्यकर्त्यांनी पुण्यात पत्रकार निखिल वागळे यांच्या कारवर शाईफेक आणि वाहन फोडण्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

निर्भय बनो'च्या सभेस जाण्यास निघालेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, वकील असीम सरोदे यांची कार अडविण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केला. पुण्यातील खंडोजी बाबा चौक येथे ही संपूर्ण घटना घडली. निखिल वागळे यांच्या कारवर अंडी आणि दगड फेकण्यात आले आहेत, अशी माहिती शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

Advertisement

Advertisement