Advertisement

 सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

प्रजापत्र | Monday, 05/02/2024
बातमी शेअर करा

 लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना नुकतीच घडली हाेती. या घटनेच्या निषेधार्थ आज साेमवार (दि ५ ) रोजी लातूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. आज लातूरकरांनी आक्रोश मोर्चा काढत संशियतास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. या माेर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग हाेता. यापूर्वी या घटनेच्या निषेर्धात नागरिकांनी निलंगा-उदगीर राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदाेलन केले हाेते. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली हाेती. तसेच देवणी तालुक्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले हाेते.

 

 

या घटनेच्या निषेधार्थ उदगीर शहरातील महिलांनी जन आक्रोश मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा देखील देण्याची मागणी केली. आता या घटनेचे पडसाद लातूर जिल्ह्यात उमटू लागले आहे.
 

Advertisement

Advertisement