खेड-शिक्षणासारख्या पावित्र्य कार्यातून पिढी घडविणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किवळेच्या आदर्श शिक्षिका सुवर्णा रामनाथ तांदळे यांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.राजगुरूनगर येथे पार पडल्या या सोहळ्यात आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सुवर्णा तांदळे यांचा गौरव करून त्यांच्या कार्याचे कौतूक केले.
शनिवारी (दि.३) गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा खांडगे लॉन्स, वाडा रोड,राजगुरूनगर येथे पार पडला.यामध्ये २०२०-२१ ते २०२३-२४ या चार वर्षाचे गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आले, यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किवळे च्या शिक्षिका सुवर्णा रामनाथ तांदळे यांना २०२१-२२ चा गुणवंत शिक्षक पुरस्कार खेड तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी खेड तालुक्याचे सर्व शिक्षकवृंद तसेच विषयतज्ञ खेड तालुका पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले,विस्तार अधिकारी श्रीरंग चिमटे,कन्या शाळेच्या आदर्श शिक्षिका आशा दादासाहेब ढाकणे मॅडम, गणेश मिसाळ हे उपस्थित होते.
बातमी शेअर करा