रायपूर - छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत १३ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. तर, तीन जवानांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले आहे. नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्यातील जगरगुंडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या टेकुलागुडेम गावात नव्याने स्थापन केलेल्या सुरक्षा छावणीवर हल्ला केला. त्यावेळी १३ पोलीस कर्मचारी जखमी झाले. ही छावणी स्थानिक जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली होती.
बातमी शेअर करा