Advertisement

 बँका बुडाल्या, ठेवीदार महिला भडकल्या

प्रजापत्र | Tuesday, 30/01/2024
बातमी शेअर करा

 बुडालेल्या बँकांमधील ठेवी परत मिळाव्या यासाठी संभाजीनगरमध्ये ठेवीदार महिलांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला. यावेळी ठेवीदार आक्रमक झाले होते. कार्यालयांच्या गेटवर चढून आत जाण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी इम्तियाज जलील आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक आणि झटापट झाली. पोलिसांनी ठेविदार आंदोलकांच्या पायावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याची माहिती आहे.

Advertisement

Advertisement