Advertisement

प्रकाश आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना सोबत येण्याची ऑफर

प्रजापत्र | Tuesday, 30/01/2024
बातमी शेअर करा

महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीची प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरु आहे.मात्र प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केल्याने ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं होते. आता तर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोबत थेट ऑफरच दिली आहे.प्रकाश आंबेडकर यांनी एकीकडे ठाकरे गटासोबत युती केली आहे. मात्र आता आंबेडकरांनी एकनाथ शिंदे यांना सोबत येण्याचं आवाहन केल्याने ठाकरे गटाची धाकधूक वाढली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ सोडून आमच्यासोबत यावं, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. 

 

 

एकनाथ शिंदे मराठा समाजाचे हिरो
सर्व मराठा समाजातील नेत्यांना बाजूला सारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मराठा समाजासाठी हिरो ठरले आहेत. एकनाथ शिंदेंबाबत मराठा समाजाची सहानूभुती वाढली आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं.

एकनाथ शिंदे हे एक स्ट्राँग मराठा लीडर बनले आहे. त्यांनी सगळ्यांना क्लीन बोल्ड केले आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाढली पाहिजे, प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.
 

Advertisement

Advertisement