Advertisement

 पतीसोबत भांडल्यानंतर पत्नीने पेटवलं घर

प्रजापत्र | Monday, 29/01/2024
बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगरमधून एक अजब घटना समोर आली आहे. पती-पत्नीचे भांडण झाल्याने संतापलेल्या पत्नीने रागाच्या भरात थेट घर पेटवलं आहे.घराला आग लावताच आगीन रौद्ररूप घेतलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतलीये.

 

 

ठाकरे नगर परिसरात ही अजब घटना घडली आहे. घटनेतील पती-पत्नी पेशाने डॉक्टर आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलं आहे. वेळीच आगीवर नियंत्रण आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. अन्यथा संपूर्ण इमारत पेटण्याची शक्यता होती. सदर घटनेत घरातील सर्व सामान जळून खाक झालं आहे.

Advertisement

Advertisement