अविराज पवार
अंमळनेर-अंमळनेर परिसरात तीन दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीचा खून झाला होता. त्या मयताची ओळख पटू नये म्हणून त्याच्या चेहऱ्यावर असिड टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला.अखेर बुधवारी (दि.३०) ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला असून मयताची ओळख अखेर पटली आहे.
दिलीप विठोबा साबळे असे त्या मयताचे नाव असुन साबळे हे पाटोदा तालुक्यातील साबळेवाङी येथील रहिवाशी असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.त्या मयताची ओळख बायोमेट्रिक मशिनच्या साह्याने आधार कार्ड वरून ओळख पटवली गेली आहे. दरम्यान आरोपीचा अद्याप शोध लागला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा
बातमी शेअर करा