Advertisement

बीड जिल्हा बँकेची निवडणूक लागणार

प्रजापत्र | Thursday, 31/12/2020
बातमी शेअर करा

कार्यक्रम सादर करण्याचे आदेश

बीड  : कोरोनामुळे रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य सहकार प्राधिकरणाने घेतला आहे. त्यानूसार राज्यातील बीडसह सात जिल्हामध्यवर्ती सहकारी बँका व इतर संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्यासंदर्भात राज्य सहकार निवडणुक प्राधिकरणाने निर्देश दिले आहेत. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अंतिम मतदार यादी यापूर्वीच प्रसिद्ध झाल्याने आता निवडणुकीचा कार्यक्रम  प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे कदाचीत जानेवारी महिन्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बीड जिल्हा बँकेसाठी मतदान होण्याची शक्यता आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक एप्रिल-मे महिन्यातच अपेक्षित होती. त्यासाठीची अंतिम 
मतदार यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या टाळेबंदीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका सरकारने पुढे ढकलल्या होत्या. आता यातील बहुतांश संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याच्या हलचाली सुरु झाल्या आहेत. त्यानूसार बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सहकार प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी पाठविण्याच्या सुचना राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाने संबंधीत अधिकार्‍यांना दिल्या आहेत. यामुळे येत्या दोन महिन्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी निवडणुक प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. 

 

Advertisement

Advertisement