Advertisement

  ‘अटल सेतू’वर पहिला अपघात

प्रजापत्र | Monday, 22/01/2024
बातमी शेअर करा

 मुंबई ट्रान्स हार्बर ब्रिज अर्थात ‘अटल सेतू’ चे काही दिवसांपूर्वीच मोठ्या थाटात उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ जानेवारीला हस्ते हे उद्घाटन पार पडले. त्यानंतर हा सेतू सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. मात्र हा पूल सुरू होऊन अवघे १० दिवसही दिवस उलटत नाहीत तोच त्यावर पहिला अपघात झाला. ‘अटल सेतू’ वर एका कारचा भीषण अपघात झाला असून त्याचे थरारक व्हिज्युअल्स समोर आले आहेत. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटून ती उलटी-पालटी झाली आणि डिव्हायडरवर जोरात धडकली.

 

 

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितनाही झालेली नाही. पण या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून तो वेगाने व्हायरल झाला आहे. त्यामुळे वेगाने जाणाऱ्या कारचालकांनी सावधानतेने गाडी चालवावी असा इशारा देण्यात येत आहे.
 

Advertisement

Advertisement