Advertisement

जुगार अड्डयावर एसपींच्या पथकाचा छापा

प्रजापत्र | Thursday, 18/01/2024
बातमी शेअर करा

गेवराई- येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधिक्षक पथक प्रमुख असलेल्या सपोनि गणेश मुंडे व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी गढी पुलाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये धाड मारत चार जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ५१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधिक्षक यांच्या पथकाच्या कारवाया जिल्हाभरात सुरु असतात.

 

आज गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या गढी उड्डाण पुलाजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती गणेश मुंडे यांना मिळाली होती. त्यानुसार येथे छापा मारून चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी सुनील नारायण धोतरे,सोमेश्वर बाबू माने,प्रदीप बाजीराव मनोहर, प्रल्हाद बापूराव देवकतेसह मटका बुक्की घेत असलेल्या राहुल खंडागळेवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement