कोल्हापूर - महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांपासूनही फारकत घेत, स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी करत असलेल्या राजू शेट्टींना भाजप वरिष्ठांकडून संपर्क करत ऑफर देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः राजू शेट्टी यांनी देखील याला दुजोरा दिला असून भाजप मध्यस्थी मार्फत मला संपर्क केला जात असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. मात्र महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही लांब ठेवत स्वतंत्रपणे आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं ही त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
बातमी शेअर करा