Advertisement

उद्या ११ वाजेपर्यंत उघडी राहणार हॉटेल आणि बार

प्रजापत्र | Wednesday, 30/12/2020
बातमी शेअर करा

बीड : राज्यात सर्वत्र नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला असला तरी ३१ डिसेंबरच्या रात्रीसाठी मात्र शासनाने जल्लोष करू इच्छिणारांची सोय केली आहे. उद्या , म्हणजे ३१ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत राज्यातील हॉटेल, पब आणि बार उघडे ठेवता येणार आहेत .
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यू सुरु आहे. त्यातच ३१ डिसेंबर रोजी होणारी गर्दी लक्षात घेऊन ठिकठिकाणी ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजताच हॉटेल, बार बंद करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने काढलेले आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने जल्लोष करू इच्छिणारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबरच्या दिवशी रात्री ११ वाजेपर्यंत राज्यभरातील हॉटेल, पब आणि बार उघडे ठेवता येतील अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे तरुणाईला मोठा दिलासा मिळणार आहे. अर्थात ही परवानगी देण्यात आली असली तरी शारीरिक अंतराचे नियम मात्र पाळावे लागणार आहेत. 

 

Advertisement

Advertisement