शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरी एसीबी पथक पोहोचले आहे. अधिकाऱ्यांकडून घराची झाडाझडती सुरू आहे.
एसीबीचे अधिकारी चौकशीसाठी राजन साळवी यांच्या घरी पोहोचले आहेत. अधिकाऱ्यांकडून घराची झडती घेण्यात येत आहे. या सर्व घटनेनंतर राजन साळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चौकशीला सामोरे जायची माझी तयारी आहे. छापा नाही. या चौकशीला मी घाबरत नाही. ज्या दिवशी पहिली नोटीस आली त्याच दिवशी मला चौकशीला सामोरे जावे लागणार याची मानसिक तयारी झाली होती आणि मी चौकशीला सामोरे जाणारच, असे राजन साळवी म्हणाले.
बातमी शेअर करा