अंबाजोगाई - अजमेरा नगर भागात युवकाचा संशयास्पद मृत्यू आढळल्याने शहरात खळबळ उडाली असून नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात मांडला आहे.
ईश्वर अरुण जोगदंड (वय ३०, रा. परळीवेस, अंबाजोगाई) असं युवकाच नाव आहे. शहरातील अजमेर नगर मध्ये मंगळवार दि.१६ जानेवारी रोजी सकाळी युवकाचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल होत मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे.
नातेवाईकांनी संशय व्यक्त करत पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. दरम्यान रात्री भांडण झाल्याची चर्चा शहरात आहे.
बातमी शेअर करा