Advertisement

बीडमध्ये जुगार अड्ड्यावर कारवाई

प्रजापत्र | Monday, 21/09/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.२१(प्रतिनिधी): शहरातील हिरालाल चौक परिसरातील पांडे गल्ली येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.वेंकटराम यांच्या पथकाने सोमवारी पहाटे कारवाई करत १४ जणांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकूण ४ लाख २२ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

   बीड शहरातील हिरालाल चौक पांडे गल्ली परिसरातील एका ठिकाणी काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.वेंकटराम यांच्या पथकाने सोमवार (दि.२१)रोजी पहाटे कारवाई केली.या कारवाईमध्ये रोख रक्कम, पत्ते आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा ४ लाख २२ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी पेठ बीड पोलीस १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि श्री.सय्यद, पोह राहुल शिंदे, अशोक दराडे तसेच पोअं अविनाश सानप, कुलदीप औसरमल, शशिकांत ढाकणे,विशाल यांनी केली.

Advertisement

Advertisement