अनैतिक संबंधातून टोकाची भूमिका घेत पत्नी किंवा पतीला संपविल्याचये गुन्हे घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशाच प्रकारचा गुन्हा हिंगोलीमध्ये घडला असून यात अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या वृद्ध आई- वडिलांसह सख्या भावाचाच खून केल्याची घटना समोर आली आहे.
हिंगोलीच्या डिग्रस वाणी गावात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनेतील आरोपी असलेल्या महेंद्र जाधव याचे बाहेर अनैतिक संबंध होते. याबाबतची माहिती आई- वडिल व भावाला झाली होती. यामुळे घरातील सर्वजण महेंद्र यास विरोध करत होते. तरी देखील तो ऐकत नव्हता. यातून आलेल्या रंगाच्या भरात महेंद्र याने आई- वडील व भावाचा खून केला.
अपघाताचा केला बनाव
तिघांच्याही खुनाची घटना लपवण्यासाठी आरोपीने दुचाकी अपघातात या तिघांचा मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. मात्र पोलिसांना संशय आल्याने हिंगोलीच्या बासंबा पोलिसांनी या घटनेचा बारकाईने तपास केला. यामध्ये आरोपीने तिघांचाही कट रचून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महेंद्र जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे.