Advertisement

जिल्ह्यातील अकरा पोलीस अधिकाऱ्यांचे खांदेपालट

प्रजापत्र | Saturday, 13/01/2024
बातमी शेअर करा

बीड-लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील ११ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या निवडणूक विभागाशी संबंधितीत नसलेल्या शाखेत करण्यात आल्या आहेत. यामध्ये यात तीन पोलीस निरीक्षक,दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक व सहा पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.

     लोकसभा निवडणूक तोंडावर आली असल्यामुळे पोलीस दलात बदल्यांचे वारे सुरु आहे. त्यानुसार पेठ बीडमधील पोलीस निरीक्षक अजिनाथ कशिद, परळी ग्रामीणचे हेमंत कदम आणि बीड शहरचे मुकुंद कुलकर्णी यांना पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.तर सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब बीड ग्रामीणमधून आता पोलीस नियंत्रण कक्ष तर नारायण गित्ते परळी ग्रामीणमधून वाचक अ.पो.अ. अंबाजोगाई येथे गेले आहेत. तसेच पोलीस उपनिरीक्षक असलेले भास्कर कांबळे वडवणीतुन नियंत्रण कक्ष, तुकाराम बोडखे गेवराईतून वाचक उप. गेवराई, शिवशंकर चोपणे बर्दपूरवरून शहर वाहतूक शाखा अंबाजोगाई,ज्ञानेश्वर राडकर दिद्रूडमधून स्थानिक गुन्हे शाखा, राहुल पतंगे पाटोदामधून युसूफवडगाव, प्रमोद यादव वडवणीवरून बर्दापूरला गेले आहेत.

Advertisement

Advertisement