Advertisement

 दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीचा कान कापून घेतला दागिना

प्रजापत्र | Tuesday, 09/01/2024
बातमी शेअर करा

धुळे - दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पत्नीच्या कानातील दागिना काढून घेण्यासाठी नवऱ्याने तिचा कानच कापून काढला. ही घटना भाटपुरा (ता. शिरपूर) येथे घडली. जखमी महिलेवर उपचार सुरू असून, पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पतीविरोधात थाळनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

जागृती घनश्याम राठोड (वय ३०, रा. भाटपुरा) असे जखमी महिलेचे नाव आहे. पती घनश्याम काळू राठोड (वय ३५) हा घरी आला असता पतीकडे ‘मला दारू पिण्यासाठी पैसे दे’ अशी त्याने मागणी केली. मात्र पत्नीने माझ्याकडे पैसे नाहीत, कुठून देऊ; असे उत्तर दिले. यानंतर पत्नीला कानातील दागिना  काढून देण्यास सांगितले. तिने नकार दिल्यामुळे घनश्याम राठोडने हातात चाकू घेऊन तिचा डावा कान कापून काढला. 

 

जखमी पत्नी रुग्णालयात 

कानातून रक्तस्राव झाल्याने ती गंभीर जखमी झाली. तिचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले. त्यांनी जागृतीला रुग्णालयात दाखल केले. तिने दिलेल्या फिर्यादीवरून पती घनश्याम राठोड याच्याविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली. हवालदार संजय धनगर तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement