मुंबई -१६ आमदार अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदतवाढ १० तारखेला संपत असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच, राहुल नार्वेकर एकनाथ शिंदेंच्या भेटीला शासकीय निवासस्थान वर्षा याठिकाणी पोहोचले होते. दोघांमध्ये तब्बल ४० मिनिटे चर्चा झाल्याचे समजत आहे. दरम्यान, या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बातमी शेअर करा