Advertisement

देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री झाले की,क्राईम आणखी वाढतो 

प्रजापत्र | Sunday, 07/01/2024
बातमी शेअर करा

पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसतायत. शुक्रवारी देखील पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या झाली. भरदिवसा गोळ्याझाडून हत्या केल्याने संपूर्ण पुणे शहर हादरलंय. अशात या घटनेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडवीसांवर गंभीर आरोप केलेत. 

 

देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री झाले की, राज्यातला क्राईम आणखी वाढतो. पुण्यात दिवसाढवळ्या खून होतात. दिवसाढवळ्या पुण्यात गाड्यांची तोडफोड होत आहे. हे ग्रृहमंत्री आणि ग्रृह खात्याचं सपशेल अपयश आहे. जेव्हा जेव्हा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतात तेव्हा तेव्हा सगळ्यात जास्त क्राईम हा नागपुरात होतो, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर हल्लाबोल करत आरोप केला आहे.
 

Advertisement

Advertisement