गेवराई- शहरात छत्रपती संभाजी नगर रोडवर एका खाजगी घरात गर्भ लिंग निदान करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागास मिळाली असता एलसीबी विभागाचे अधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांनी धाड टाकली. या धाडीत आरोपी मनीषा पवार हिला पोलिसांनी गर्भ लिंग निदान करत असताना अटक केली असून डॉ.सतीश गवारे हा पळून गेला आहे.यापूर्वी ही या डॉक्टरने अशाच पद्धतीने गर्भ लिंग निदान केले होते. या ठिकाणी गर्भपाताचे औषध,सोनोग्राफी मशीन तसेच इतर साहित्य पोलिसांना मिळून आले आहे.
यापूर्वी तत्कालीन बीडचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुरेश साबळेंनी अशीच धाड टाकली होती, या प्रकरणी यातील मनीषा पवार आणि डॉ.सतीश गवरे यांना न्यायालयाने जामीन दिल्या नंतर काही दिवसातच या दोघांना पुन्हा एकदा हे कुकर्म करण्यास सुरुवात केली. याबाबत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.