केज दि.२ (प्रतिनिधी): मुलाने केलेल्या कामाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका मजुरास एका मजुरास जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्याने व चापटाने मारहाण करीत डोक्यात दगड आणि वीट मारून डोके फोडल्याची घटना जिवाचीवाडी येथे घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या पती-पत्नी विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील धनराज बाबुराव वाघमारे वय (५४ वर्ष) हे २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास गावातील किराणा दुकाना समोर त्यांच्या मुलाने केलेल्या कामाचे पैसे माऊली दिनकर चौरे याच्याकडे मागण्यासाठी गेले होते. “तुझे कशाचे पैसे ? माझ्याकडे पैसे नाहीत.” म्हणत माऊली चौरे व त्यांची पत्नी शीतल चौरे या दोघांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून धनराज वाघमारे यांना लाथाबुक्याने व चापटाने मारहाण केली. तसेच दगड, वीट डोक्यात मारून त्यांचे डोके फोडले.धनराज वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माऊली चौरे, शीतल चौरे या दोघाविरुद्ध केज पोलिसात ॲट्रॉसिटीचे अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून तपास प्रभारी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे हे करीत आहेत.

