Advertisement

रूग्णवाहिकांच्या चालकांचे नऊ महिन्याचे वेतन थकले  

प्रजापत्र | Wednesday, 03/01/2024
बातमी शेअर करा

बीड - रूग्ण वाहिकांवर चालक म्हणुन काम करणार्‍या कामगारांचे नऊ महिन्यांचे वेतन थकीत राहिले आहे. वेतना अभावी त्यांच्यावर उपाासमारीची वेळ आली. वेतना संदर्भात त्यांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तगादा लावला मात्र त्यांना वेतन देण्यात आले नाही. आज सर्व चालक वेतनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

 

जिल्ह्यामध्ये जि.प अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात चालक कार्यरत आहेत. हे चालक कंत्राटी बेसवर असुन त्यांचा नऊ महिन्याचा पगार थकलेला आहे. पगारासाठी त्यांनी अनेक वेळा विनवनी केली. मात्र याची दखल संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी घेतली नाही. नऊ महिन्याचा पगार द्यावा.या मागणीसाठी चालक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. 

Advertisement

Advertisement