Advertisement

क्रेडीट कार्ड चालु करून देतो म्हणत शासकीय कर्मचार्‍याला लावला चुना 

प्रजापत्र | Wednesday, 03/01/2024
बातमी शेअर करा

 बीड - एकसेस बॅकेचे क्रेडिट कार्ड चालु करून देतो म्हणुन एका भामट्याने शासकीय कर्मचार्‍याला १ लाख २८ हजार ३२४ रूपयांना ऑनलाईन गंड्डा  घातला आहे. आपली फसवणूक झाल्याचे कर्मचार्‍याला लक्षात आल्यानंतर सदरील कर्मचार्‍यानी सायबर पोलिसात धाव घेवून तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

सविस्तर माहिती अशी कि तुषार नामदेव पवार  (रा.टीपीसी कॉलनी परळी) यांना ७३०२०७५९०४ या क्रमांकावरून कॉल आला होता. तुमचे एक्सेस बॅक क्रेडीट कार्ड हे आधार कार्ड वरून रजिस्ट्रेशन केल्याने ते रद्द झाले असे सांगण्यात आले. एक्सेस बॅक क्रेडीट कार्ड चालु करण्यासाठी फिर्यादीस प्लेस्टोअर मधून टीम व्हिवर डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादीच्या क्रेडीट कार्ड मधुन १ लाख २८ हजार ३२४ रूपये ट्रान्सर्फर करून फिर्यादीची ऑनलाईन फसवणुक करण्यात आली. आपले पैसे गेल्याचे पवार यांच्या निर्देशनास आल्यानंतर त्यांनी बीडच्या सायबर क्राईमकडे धाव घेतली. फिर्याद दाखल केल्यानंतर संबंधिता विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement