भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना केपटाऊनच्या मैदानावर सुरु आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ३२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान दुसऱ्या सामन्यातील पहिल्याच डावात भारतीय संघाने दमदार खेळ केल्याचे पाहायला मिळाले आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय पूर्णपणे चूकीचा ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. मोहम्मद सिराजच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ५५ धावांवर संपुष्टात आला आहे.
बातमी शेअर करा