Advertisement

पोलिस महासंचालक रजनीश शेठ पदावरून निवृत्त 

प्रजापत्र | Sunday, 31/12/2023
बातमी शेअर करा

  राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता पदभार सोपवण्यात आला. पुढील आदेशापर्यंत त्यांच्याकडे हा कार्यभार राहणार आहे.यातच गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय सशस्त्र सीमा बलाच्या प्रमुख रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक होतील, अशी चर्चा आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांची निवड करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिल्याचंही बोललं जात होतं.

Advertisement

Advertisement