Advertisement

 माझ्यावर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा 

प्रजापत्र | Wednesday, 27/12/2023
बातमी शेअर करा

माझ्यावर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, अशा शब्दांत खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघावरून अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात वादांग सुरू आहे. अमोल कोल्हे राजीनामा का देणार होते, याचं गुपित काल अजित पवारांनी उघड केलं. तसेच अमोल कोल्हेंवर टीका केली.अशात आता दादांच्या या टीकेला अमोल कोल्हेंने शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. 

 

राज्यात दोन उपमुख्यमंत्री दोघेही ताकदीचे नेते आहेत. सत्तेसाठी राज्यातले नेते केंद्रात जातात त्याच घाईने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी का जात नाही, असा थेट सवाल कोल्हेंनी केलाय. माझ्यावर टीका करण्यापेक्षा आपली ताकद शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वापरावी, असा इशारा देखील अमोल कोल्हेंनी अजित पवारांना दिलाय.

Advertisement

Advertisement