बीड | राष्ट्रवादीचे आ.संदिप क्षीरसागर यांचे समर्थक तथा बीड नगरपरिषदेचे नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधले.गुंजाळ यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे आ.संदीप क्षीरसागरांना मोठा धक्का बसला आहे.
बाळासाहेब गुंजाळ यांनी गेल्या दहा वर्षापासून पेठ बीड भागात सिंहासनाधिश ग्रुपच्या माध्यमातून युवकांचे मोठे संघटन निर्माण केलेले आहे. समाजकारणातून आलेल्या गुंजाळ यांनी राजकारणात सक्रिय होत गत पंचवार्षिकमध्ये नगरसेवक पद भुषविले होते. सध्या त्यांच्या पत्नी नगरसेविका आहेत. बाळासाहेब गुंजाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.संदीप क्षीरसागर यांचे समर्थक होते. श्री.गुंजाळ यांनी आपल्या दहा वर्षाच्या सामाजिक जीवनात वंचित,उपेक्षित आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम केलेले आहे. त्यांच्या प्रवेशाने पेठ बीड भागात पुन्हा एकदा शिवसेनेचे भगवे वादळ निर्माण होणार आहे अशा शब्दात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी गुंजाळ यांचे स्वागत केले.
बातमी शेअर करा