पुणे- जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्ख्या मामीनेच आपल्या भाचीला विवस्त्र करून मारहाण केली आणि त्यानंतर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मामीला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. मारहाणीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
काय आहे नेमकं प्रकरण?
पुणे जिल्ह्यातील हा धक्कादायक प्रकार आहे. अत्याचार झाला त्यावेळी पिडीत चिमुरडी अवघ्या नऊ वर्षाची होती. मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार जानेवारी ते ऑगस्ट २०२१ दरम्यान घडला आहे. पिडीत भाची आपल्या मामाकडे राहण्यास आली होती. मामा कामाला गेल्यानंतर मामी भाचीला विवस्त्र करुन मारहाण करत असे. तब्बल दोन वर्षानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
फिर्यादी महिलेने कोरोनाची लाट असताना तिच्या नऊ वर्षांच्या मुलीला भावाकडे राहण्यासाठी पुण्याला पाठवले होते. भाऊ हवाई दलात नोकरीला असल्याने त्याचे कुटुंब हवाई दल वसाहतीत राहते.मामा कामावर गेल्यावर पत्नी नणंदेच्या मुलीला विवस्त्र करून बेदम मारहाण करायची. याशिवाय तिने मुलीचे विवस्त्र फोटो काढून तिला जीवे मारण्याची धमकी देत होती. काही काळानंतर पीडित मुलगी तिच्या मूळ गावी गेल्यावर तिने मामाच्या घरी मामीने केलेला अत्याचार सांगितला. महिलेवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असून नराधम मामावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.