Advertisement

खंडोबा मंदिरातील दानपेटीच जाळली

प्रजापत्र | Friday, 22/12/2023
बातमी शेअर करा

शिरूर कासार दि.२२ (प्रतिनिधी)- तालुक्यातील हिवरसिंगा गावात काल मध्यरात्री खंडोबा मंदिराची दान पेटी अज्ञातांनी जाळल्याचा प्रकार उघडकीस आला असून यामध्ये दहा ते पंधरा हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

तालुक्यातील हिवरसिंगा या गावात खंडोबा मंदिर आहे. दोन दिवसापूर्वीच गावात खंडोबा यात्रा पार पडली. यामध्ये अनेक भाविकभक्तांनी दानपेटीत देणगी टाकली. मात्र काल रात्री अज्ञात व्यक्तीने ही दानपेटी जाळली. सकाळी येथील ग्रामस्थ मंदिरात आले असता दानपेटी जाळल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकारची तात्काळ शिरूर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर सकाळी बीट अंमलदार श्री.सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसून पुढील तपास सुरु आहे.

Advertisement

Advertisement