नाशिक- माजी खासदार, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा विधानपरिषद सदस्य राहिलेले प्रतापदादा सोनवणे यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा राहत्या नाशिक येथील घराजवळून कामधेनु बंगला डिसूजा कॉलनी, जेहान सर्कल सर्कल जवळ, गंगापूर रोड येथून दुपारी तीन वाजता निघेल. वर्षभरापूर्वी त्यांच्या सामाजिक व राजकीय कारकिर्देबद्दल त्यांचा जीवन गौरवाने सन्मान करण्यात आला होता. ते धुळे लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून गेले होते.
बातमी शेअर करा