Advertisement

उमेदवारांना सहकारी बँकेतही उघडता येणार खाते

प्रजापत्र | Monday, 28/12/2020
बातमी शेअर करा

ग्रामपंचायत निवडणूक

बीड : राज्यात सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना स्वतंत्र बँक खाते उघडणे बंधनकारक करण्यात आले आहे, मात्र राष्ट्रीयकृत आणि शेड्युल्ड बँकेत खाते उघडण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आता राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना सहकारी बँकेतही खाते उघडण्यास परवानगी दिली आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम सुरु असून १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवाराने बँकेत नवीन चालू किंवा बचत खाते उघडावे आणि निवडणुकीशी संबंधित सर्व खर्च त्याच खात्यावरून करावेत असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. सदर बँक खाते राष्ट्रीयकृत किंवा शेड्युल्ड बँकेतील असावेत असे निर्देश होते. मात्र या बँकांमधून खाते उघडण्यात अनेकांना अडचणी येत होत्या. अनेक ठिकाणी राष्ट्रीयकृत बँक असे खाते उघडण्यास फारश्या इच्छुक नसल्याने उमेदवारांची अडचण होत आहे. या पार्श्वभूमीवर आता उमेदवारांना सहकारी बँकेत देखील खाते उघडायला राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.

Advertisement

Advertisement