बीड-तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरटी वाळू वाहतूक करणारे दोन टेम्पो आज पोलीस अधिक्षक पथक प्रमुख गणेश मुंडे यांनी ताब्यात घेतले आहेत. या कारवाईत १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बीड जिल्ह्यात वाळू माफियांच्या विरोधात गणेश मुंडे यांनी कारवाईची मोहीम जोरदार राबवली आहे. वाळू साठ्यांसह आता वाहनातून होणाऱ्या चोरट्या वाहतूकीवर एसपींच्या पथकाने कारवाई करण्यास सुरुवात केली. आज नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन टेम्पोमधून वाळूची वाहतूक सुरु होती. विशेष म्हणजे या टेम्पोत वरी खडी आणि खाली वाळू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दोन्ही टेम्पो पोलिसांनी जप्त केले असून यात १५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
बातमी शेअर करा