बीड- शहरातील बसस्थानकात एका एसटी बसच्या टायरखाली आल्याने युवकाच्या एका पायाचा चेंदामेंदा झाल्याची घटना आज घडली आहे. तेथील प्रवाशांनी तात्काळ त्याला रूग्णालयात दाखल केले.
शहरातील बसस्थानकात आज दुपारी धुळे-सोलापुर बस क्र.एम.एच. 15.जे.सी.4663 प्लॅटफॉर्मवर लागत असतांना प्रवाशांनी जागा धरण्यासाठी बसच्या आजू-बाजूला गर्दी केली. त्याचवेळी राधेशाम आमटे (रा.खांडे पारगाव) यांचा पाय बसच्या पुढच्या टायरखाली आला. टायर पायावरून गेल्याने आमटे यांच्या एका पायाचा अक्षरशःचेंदामेंदा झाला. आजूबाजूच्या प्रवाशांनी त्यांना तात्काळ रूग्णालयात हलविले. या घटनेने एसटी चालका विरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.
बातमी शेअर करा