Advertisement

तेली समाजाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी आ. संदीप क्षीरसागर यांची निवड

प्रजापत्र | Sunday, 27/12/2020
बातमी शेअर करा

"सर्वांना सोबत घेत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशिल राहिल"-.संदिप क्षीरसागर

बीड | महाराष्ट्रक प्रांतिक तैलीक महासभेच्या युवक अध्यक्षपदी सर्वानुमते बीडचे आमदार संदिप भैय्या क्षीरसागर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रांतिक तैलीक महासभेतील पदाधिकार्‍यांनी आ.संदिप क्षीरसागर यांच्या खांद्यावर तैलीक महासभेच्या युवक अध्यक्षाची जबाबदारी देवून ज्या संघटनेच्या उभारणीसाठी स्व.काकूंनी देशभरात काम केलं त्या संघटनेत मला काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो. पुढील काळात समाज बांधवांना सोबत घेवून राज्यभर समाजाचे प्रश्न समजावून घेत ते सोडवण्यासाठी प्रयत्नशिल राहिल अशी ग्वाही आ.संदिप क्षीरसागर यांनी दिली आहे. 

 

रविवार दि.27 डिसेंबर रोजी पुणे येथील साहित्यीक विजय तेंडुलकर सभागृहात महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या पदाधिकार्‍यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे अध्यक्ष खा.रामदासजी तडस साहेब, महासचिव डाॅ. भूषण कर्डीले, कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, कोषाध्यक्ष गजानन शेलार, सहसचिव बळवंत मोरघडे, सहसचिव संजू शेलार, आबासाहेब बागुल यांच्यासह महाराष्ट्र प्रांतिक महासभेच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. या महासभेच्या बैठकीत सर्वानुमते बीडचे आ.संदिप क्षीरसागर यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या युवक अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी निवड झाल्यानंतर बोलतांना आ.संदिप क्षीरसागर म्हणाले की, तैलीक महासभेचे अध्यक्ष खा.रामदासजी तडस साहेब यांनी युवक अध्यक्षपदाबाबत विचारना केल्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना तैलीक संघटनेत काम करण्याबाबत विचारना केली मार्गदर्शन मागितलं. आदरणीय पवार साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता तैलीक महासभेत काम करा, समाजाचे प्रश्न सोडवा असा आदेश दिल्यानंतर तैलीक महासभेच्या बैठकीला उपस्थित राहिलो आहे. युवक अध्यक्ष या पदावर माझी निवड केल्याबद्दल अध्यक्ष खा.रामदासजी तडस साहेब, महासचिव डाॅ.भूषणजी कर्डीले यांच्यासह सर्व पदाधिकार्‍यांचे आभार मानतो. महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेतील सर्व युवक बांधवांना माझी विनंती राहिल आपण मला साथ द्यावी, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्व मिळून एकतेच्या सुत्राने काम करूया, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशिल राहुया अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी तैलीक महासभेच्या महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातील पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. 

 

पवार साहेबांनी सांगितलं,कोणतंही पद घ्या, समाजाचे प्रश्न सोडवा!

महाराष्ट्र तैलीक युवक महासभेचे अध्यक्षपद स्विकारण्याबाबत महाराष्ट्राचे अध्यक्ष खा.रामदासजी तडस यांच्याकडून बोलवणं आल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांना महाराष्ट्र तैलीक युवक महासभेचे अध्यक्षपद स्विकाराणे बाबत मार्गदर्शन मागितले. आदरणीय पवार साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता समाजाचे प्रश्न महाराष्ट्र तैलीक महासभेच्या माध्यमातून कोणतंही पद घ्या समाजाचे, प्रश्न सोडवा,जिथे गरज लागेल तेथे हक्काने सांगा अशी सूचना केल्यानंतर आ.संदिप क्षीरसागर यांनी रविवारी पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र तैलीक महासभेच्या बैठकीत महाराष्ट्र तैलीक युवक अध्यक्षपद स्विकारले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील तैलीक महासभेतील सर्व पदाधिकार्‍यांनी सर्वानुमते आ.संदिप क्षीरसागर यांची निवड केली आहे.

Advertisement

Advertisement