Advertisement

पीएचडीबाबतच्या वक्तव्यावरून अजितदादांची दिलगिरी

प्रजापत्र | Thursday, 14/12/2023
बातमी शेअर करा

 नागपूर -  हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर विधान परिषदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान “पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?”, असे वादग्रस्त विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. विधान परिषदेतील या वक्तव्यामुळे अजित पवार समाजमाध्यमांवर ट्रोल होऊ लागले. पीएचडी करणारे विद्यार्थी अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत, तर काहींनी अजित पावारांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. विरोधकांनीही अजित पवारांवर यावरून निशाणा साधला. हा वाद वाढतच चालल्याचे पाहून उपमुख्यमंत्री पवार यांनी आज आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली.

Advertisement

Advertisement