नागपूर - राज्यात आजवर आठ वेळा मराठा मुख्यमंत्री झाल्यानंतरही मराठ्यांना न्याय मिळू शकला नाही. आता मराठ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय पक्ष मराठ्यांना मुख्यमंत्री बनवावे अशी हास्यास्पद मागणी करत आहेत. मराठेच आपल्या समाजाला न्याय देऊ शकले नाहीत तर ओबीसी मुख्यमंत्री हे करू शकेल, असा उपरोधिक सवाल अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
मराठा आंदोलनासंदर्भात बोलताना कडू असेही म्हणाले की आता आंदोलने ही शक्तीने नव्हे तर युक्तीने आणि डावपेचांनी लढली जातात. या डावपेचांमध्ये कोण कुणाच्या बाजूने हे चेहरे बघितले तरी लक्षात येते, असेही कडू म्हणाले.
बातमी शेअर करा