Advertisement

छत्रपती शिवरायांशी तुलना करण्याइतके भरत गोगावले मोठे झाले का?  

प्रजापत्र | Wednesday, 13/12/2023
बातमी शेअर करा

नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाचे आणि इंग्रजांचे नाक कापायला सुरतेला गेले होते. गोगावले आणि इतर लोक नेमके कुणाचे नाक कापण्यासाठी तेथे गेले होते, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

 

 

छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत रुबाबात सुरतेला गेले होते आणि हे सगळे लोक ज्यांनी यांना मोठे केले त्यांच्याशीच गद्दारी करुन गेले. याआधी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांचा अपमान केला होता आणि आता छत्रपती शिवाजी महाराजाचांही अपमान केला आहे. शिवाजी महाराजांबरोबर तुलना करण्याएवढे गोगावले मोठे झाले का? असाही सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement

Advertisement