Advertisement

पिंपळनेर पोलीस हद्दीत एसपींच्या पथकाचा छापा

प्रजापत्र | Tuesday, 12/12/2023
बातमी शेअर करा

बीड-पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधिक्षक पथक प्रमुख गणेश मुंडे यांनी वाळू साठ्यावर छापा मारून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.१२) करण्यात आली. सपोनि गणेश मुंडे यांनी वाळू माफियांच्या विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतल्यामुळे माफियांचे धाबे चांगलेच दणाणले होते. मंगळवारी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एकदा पथक प्रमुख गणेश   मुंडे यांनी वाळू साठ्यावर छापा मारून ७ ते ८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाईमुळे पुन्हा एकदा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.नायब तहसीलदार नागरगोजे घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी आले आहेत

Advertisement

Advertisement