Advertisement

 मायावतींनी कोणाला केला आपला उत्तराधिकारी? 

प्रजापत्र | Sunday, 10/12/2023
बातमी शेअर करा

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी त्यांचा पुतण्या आकाश आनंद यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मायावतींनी मोठी घोषणा केली आहे. पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आकाश आनंद यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती.

 

 

आकाश आनंद यांनी राजस्थानपासून मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडपर्यंत पक्षाला मजबूत करण्याचा प्रयत्न केला. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मायावतींनी आकाश आनंदला राष्ट्रीय मोठा चेहरा बनवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी बसपाचे प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हा नेत्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. सभेत मायावतींनी ही मोठी घोषणा केली.

Advertisement

Advertisement