सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जिल्ह्यातील ऊस दर जाहीर करावा या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज (रविवार, १० डिसेंबर) उसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वसंतदादा कारखान्यावर धडक दिली. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांकडून कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.
सविस्तर माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील ऊस दर जाहीर करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनने सांगलीती ल दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्यावर धडक दिली. यावेळी कारखान्याच्या मुख्य गेटवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करत कारखान्याच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र पोलिसांनी या आंदोलकांना गेटवरच थांबवले, त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांच्यामध्ये झटापटीचा प्रकार देखील घडला . या ठिकाणी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काटाबंदी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखाना परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील असण्यात करण्यात आला आहे.