Advertisement

३१ डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय येणार का?  

प्रजापत्र | Wednesday, 06/12/2023
बातमी शेअर करा

सात डिसेंबरपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण यासह अवकाळी पावसामुळे झालेले शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान, राज्यातील कायदा-सुव्यवस्था अशा अनेकविध विषयांवरून हे हिवाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. यातच दुसऱ्या बाजूला आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू असून, ३१ डिसेंबरपर्यंत याबाबत निकाल येणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सूचक विधान केले आहे. 

 

 

प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, सभागृहाचे कामकाज किंवा देश-राज्यात शासन चालवण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरच चालते. महाराष्ट्रातील जनतेला आश्वासित करू इच्छितो की, संविधानाने दिलेल्या नियम आणि तरतुदींनुसारच हिवाळी अधिवेशनाचे कामकाज चालेल. संविधानाच्या तरतुदी आणि नियमांची कुठेही पायमल्ली होणार नाही. नियमांनुसार सभागृह चालवले जाईल. सर्व आमदारही संविधानाची शपथ घेऊन सभागृहात काम करत असतात, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. 

 

 

Advertisement

Advertisement