राज्यात अनेक ठिकाणी ३ डिसेंबरनंतर दंगलींची शक्यता आहे. सगळ्या पोलीस स्टेशन्सला तसा अलर्ट आलाय, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसंच ६ डिसेंबरनंतर काहीही होऊ शकतं अशी पोलिसांना सूचना आहे, असंही आंबेडकर म्हणाले. तसंच देशात मुस्लिमांना आणि ओबीसींना टार्गेट केलं जात आहे. प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातील महात्मा फुलेवाड्यात अभिवादन केलं त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आंबेडकर म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला सतर्क करण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीत ६ डिसेंबरनंतर काहीही घडू शकते. चार राज्याच्या निवडणूका झाल्यानंतर घडेल. मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण टार्गेट केलं जात आहे. समाजात अशांतता पसरवली जाते आहे. आंदोलनाशी संबंध नसलेल्यांचा वापर केला जात आहे. ओबीसींनी सतर्क राहा.