Advertisement

भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश सचिव पदी बाळासाहेब केदार यांची नियुक्ती

प्रजापत्र | Wednesday, 22/11/2023
बातमी शेअर करा

मुंबई - भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेशाच्या सचिव पदी शिरूर कासार तालुक्याचे भूमिपुत्र श्री बाळासाहेब केदार यांची नियुक्ती भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब,भाजपा प्रदेश सरचिटणीस संजयजी केनेकर, VJNT सेलचे प्रदेशाध्यक्ष राहुल भैया केंद्रे,भाजपा प्रदेश चिटणीस किरणजी पाटील,यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.

 


 

 

 शिरूर कासार तालुक्याचे भूमिपुत्र श्री बाळासाहेब केदार हे भारतीय जनता पार्टीचे गेल्या १५ वर्षापासून एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. शिरूर कासार तालुका पंचायत समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे.शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागापर्यंत त्यांनी शाळांची सुरवात केली आहे. विविध शाळेच्या माध्यमातून गोरगरीब मुलांच्या शिक्षणासोबतच समाजकारणातही ते सक्रिय आहेत. संपूर्ण राज्यभर त्यांचा मोठा संपर्क असून भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश सचिव पदी त्यांची नियुक्ती झाली असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Advertisement

Advertisement