बीड - गेवराई शहरातील बस स्थानकाच्या शेजारी सुरु असलेल्या मटका बुकीवर मंगळवार (दि.२१) रोजी पोलीस अधिक्षक पथक प्रमुख गणेश मुंडे यांनी धाड टाकत सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत हजारोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे आज सकाळी गणेश मुंडे यांनी गोदापात्रात कारवाई करून पाऊण कोटींचा वाळू साठा जप्त केला होता.
गेवराई शहराच्या मध्यभागी असलेल्या बसस्थानकाच्या शेजारी मटकाबुकी सुरु असल्याची माहिती मिळाली असता मंगळवार (दि.२१) रोजी पोलीस अधीक्षक पथक प्रमुख गणेश मुंडे यांच्या पथकाने या बुकीवर धाड टाकली.यावेळी २४ हजाराची रोकड यासह एकूण ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण ६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती
बातमी शेअर करा