Advertisement

जालन्यात धनगर मोर्चाला हिंसक वळण

प्रजापत्र | Tuesday, 21/11/2023
बातमी शेअर करा

धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्च्याला जालन्यात हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. या मोर्चा दरम्यान जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारायला खाली आले नाहीत, त्यामुळे आंदोलन आक्रमक झाले. यावेळी आंदोलकांनी गेटवरून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी तुफानदगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या जिल्हाधिकारी परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. 

Advertisement

Advertisement